Pumpkin Seeds : फक्त भोपळ्याच्या बियांपासून शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
भोपळ्याच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. कारण त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. तर मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड त्यांच्या बियांमध्ये आढळतात. जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम आढळते, ज्यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते. तसेच हाडांशी संबंधित आजार होण्यापासून रोखतात.
भोपळ्याच्या बिया चयापचय वाढवतात.त्या हळूहळू पचतात. त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
जर तुम्ही तणावाचा सामना करत असाल तर भोपळ्याच्या बियांचा आहारात समावेश करावा. कारण त्यामध्ये ट्रायप्टोफॅन अमिनो अॅसिड आढळते जे तणाव कमी करण्यास मदत करते.
भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले खनिजे रक्तातील मीठाचे प्रमाण सामान्य ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
भोपळ्याच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरतात. भोपळ्याच्या बिया इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यात फायबर असल्यामुळे ते पचनक्रिया मंदावते.
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने केसांना खूप फायदा होतो. यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांची वाढ वाढवण्यास मदत करतात. यामुळे केस तुटण्याची प्रक्रियाही कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.