Sindhudurg : तळकोकणात पिकांच्या लागवडीला सुरुवात, पाहा फोटो
सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) कोसळत आहे. (फोटो : परेश कांबळी )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय, त्याठिकाणी शेतीकामांना वेग आला आहे. शेतकरी खरीप पिकांची लागवड करत आहेत. (फोटो : परेश कांबळी )
मागील काही दिवसापासून तळकोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं शेतकरी पिकांच्या लागवडीत व्यवस्त असल्याचे चित्र दिसत आहे. (फोटो : परेश कांबळी )
तळकोकणात चांगला पाऊस झाल्यामुळं शेतकरी पिकांची लागवड करत आहेत. अनेक ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झाली आहे. (फोटो : परेश कांबळी )
सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयुक्त असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असतानाची काही दृश्य परेश कांबळी यांनी ड्रोनच्या माध्यमातुन टिपली आहेत. (फोटो : परेश कांबळी )
अखेर राज्यातील काही भागात पावसानं चांगली हजेरी लावल्यानं शेती कामांना गती मिळाली आहे. (फोटो : परेश कांबळी )
जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये. पेरणीसाठी 75 ते 100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. (फोटो : परेश कांबळी )
सध्या राज्यातील कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर या जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. (फोटो : परेश कांबळी )
तळकोकणात चांगला पाऊस झाल्यामुळं शेतकरी पिकांची लागवड करत आहेत. अनेक ठिकाणी भात लागवडीला सुरुवात झाली आहे. (फोटो : परेश कांबळी )