Nashik : नाशिकमध्ये हुडहुडी, चांदीच्या गणपतीला स्वेटर अन् शॉल घातली; बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पाहा PHOTOS
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
10 Dec 2024 10:42 AM (IST)

1
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. नाशिकमध्ये देखील थंडीचा जोर कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
दरम्यान, नागरिक थंडीपासून स्वतःचे रक्षण करत असतानाच धार्मिक नगरी असणाऱ्या नाशिकच्या मंदिरातील देवांनाही ऊबदार कपडे परिधान करून थंडीपासून त्यांचे संरक्षण केले जात आहे.

3
या ठिकाणी कारंजा परिसरातील चांदीच्या गणेश मूर्तीला स्वेटर परिधान करून, शाल पांघरून बाप्पाचे थंडी पासून रक्षण केले जात आहे.
4
गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर जाणवत असतो. गोदाकाठ परिसरात असंख्य मंदिर आहेत.
5
त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकां प्रमाणेच देवालाही थंडी जाणवते अशी भक्तांची भावना आहे.
6
त्यामुळेच देवाला उबदार कपडे परिधान केले जात आहेत.