Panchavati Express: नाशिक-मुंबई प्रवास होणार आरामदायी, पंचवटी एक्सप्रेसचे 11 कोच बदलले
मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आजपासून नव्या रंगात, नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे
Panchavati Express
1/10
नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसचे 11 कोच बदलले आहे.
2/10
11 कोच बदलल्याने प्रवाशांचा प्रवास आता आरामदायी झाला आहे.
3/10
जिल्ह्यातील चाकरमान्यांची प्रमुख भिस्त असणारी रेल्वेगाडी म्हणून मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसची ओळख आहे.
4/10
नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आदींसाठी ही सोयीची गाडी आहे.
5/10
नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही सोयीची आहे.
6/10
मनमाड ते नाशिक व नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
7/10
पंचवटी एक्स्प्रेसला 2018 पासून एलएचबी रेक जोडण्यात आले होते.
8/10
मात्र त्यांची आसन व्यवस्था बसण्यासाठी योग्य व पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांना पाठदुखी आणि मानदुखी या सारख्या समस्या सुरू झाल्या
9/10
आता रेल्वे प्रशासनाने पंचवटी एक्स्प्रेसचे 11 कोच बदलले आहे.
10/10
आसन व्यवस्थाही योग्य झाल्याने प्रवास सुखकर होणार असल्याने प्रवाशी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे..
Published at : 20 Jul 2023 12:48 PM (IST)