Nashik Bus Accident : अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्याचे काम फत्ते!
मागील आठवड्यात 12 जुलै रोजी सप्तशृंग गडावरील (Saptashrungi Gad) गणपती टप्प्याजवळ बस कोसळली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अपघातात बसमधील एक महिला प्रवाशाचा मृत्यू झाला होता तर चालक वाहक यांच्यासह 22 जण जखमी झाले होते.
सप्तशृंगगड ते नांदुरी (Saptashrungi Gad To Nanduri) आणि नांदुरी ते सप्तशृंगगड (Nanduri To Saptashrungi Gad) रस्ता आज (19 जुलै) बंद ठेवला होता
नाशिकच्या सप्तशृंगगड येथे 12 जुलैला झालेल्या अपघातातील अपघात ग्रस्त बस दरीच्या बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर आज सकाळी दहा वाजता सुरु केले होते
3 क्रेनसह आपत्ती व्यवस्थापन, कळवण बस आगार, पोलीस प्रशासन, वन विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ यांच्या मदतीने बस दरीतून काढण्याची कार्यवाही पूर्ण केली
मागील आठवड्यात अपघात होऊन दरीत कोसळलेली बस (Bus Accident) काढण्यासाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता
सकाळी दहा ते कार्यवाही सुरु करण्यात आली होती
12 जुलै रोजी सकाळच्या सुमारास नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात (Saptashrungi Gad Ghat) बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला.
सप्तशृंगी गडावरुन बस साडेसहा वाजता निघाल्यानंतर पुढच्या दहा मिनिटात घाटातील गणपती पॉईंटजवळ बसला अपघात झाला.
या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही बस सप्तशृंगी गडावरुन खामगावच्या दिशेने निघाली होती.
त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली.
image 10