Nashik Navrtari 2023 : महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच एकरूप म्हणजे कोटमगावची जगदंबा माता; मंदिरावरील विद्युत रोषणाई, पहा फोटो
कोटमगावची देवी जागृत असून, ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे देवस्थान अतिशय जागृत व जाज्वल म्हणून परिचित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती हे तीनही रूप एकाच ठिकाणी पहावयास मिळत असल्याने येथे विशेष महत्व आहे.
सप्तश्रुंग, माहूर, तुळजापूर या तीन क्षेत्रांचे उगमस्थान म्हणून कोटमगावची जगदंबा माता ओळखली जाते.
नवरात्रीनिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरावर तसेच भक्तनिवास येथे आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे..' ड्रोन ' च्या माध्यमातून या विद्युत रोषणाईचे अप्रतिम असे दृश्य टिपले गेले आहे.
जगदंबा माता मंदिर परिसर व यात्रेमध्ये असणाऱ्या पाळण्यांवर देखील आकर्षक विद्युत रोषणाई केल्याचे पाहायला मिळत आहे.
यात्रा काळात मातेला नवनवीन प्रकारच्या पैठण्या साड्या परिधान केल्या जाऊन सोन्या चांदीचे अलंकार चढविले जातात.
मातेचा नैवद्य चांदीच्या ताटात आणि चंदनाच्या पाटावर अशा शाही थाटात दाखविला जातो. मातेचे तेजस्वी व मोहक रूप पाहून भक्तगण भारावून जातात.
उदे गं अंबे उदे आई उदे गं अंबे उदे चा जयजयकार होतो. महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण भारतातून भक्तांचा महासागर या ठिकाणी पहावयास मिळतो.
नवसाला पावणारी माता अशी या देवस्थानची ख्याती असल्याने घटी बसण्याची अतिशय जुनी व तुलनेने सर्वाधिक अशी परंपरा दिसून येते. (ड्रोन सौजन्य - साई पल्हे, येवला)