Kalsubai : कळसूबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पाहा फोटो
आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत म्हणून ओळख असणाऱ्या कळसूबाईच्या दर्शनासाठी उंच शिखर चढून भक्त दर्शन घेतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी नवरात्र उत्सव शिखरावर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
राज्यातील सर्वात उंच असलेल्या शिखरावर दर्शनासाठी भक्त पोहचत असून बालगोपाळांसह वयोवृद्धही कठीण असा डोंगर चढत असल्याचं पाहायला मिळालं.
शिखर सर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभाग, पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळालं.
भाविकांनी कळसूबाई शिखरावर चढताना काळजी घ्यावी आणी अस्वच्छता करू नये असं आवाहन प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थांनी केलं आहे.
दरम्यान कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
तर हे शिखर पार करुन भाविक कळसूबाईचं दर्शन घेण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान यामध्ये वयोवृद्धांचा समानेश असल्याचं देखील यावेळी पाहायला मिळालं.