National Youth Festival : 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकला, कशी सुरुय युवा महोत्सवाची तयारी?; पाहा Photos
राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वीपणे पार पडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रीय युवा महोत्सवात नाशिकमध्ये एकूण ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. यासाठी एकूण 20 समित्यांची नेमणूक करण्यात आली असून 75 अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
12 जानेवारी रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला एक लाख नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर्मन टेक्नोलॉजीवर आधारीत मंच नाशिकमध्ये उभारला जात आहे.
शुभंकर चिन्ह म्हणून महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ची निवड करण्यात आली आहे.
देशभरातील आठ हजार युवक-युवती या महोत्सवात सहभाग घेणार आहेत. त्यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
मंडप उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.
परराज्यातील 300 हून अधिक कामगार सध्या मंडप उभारणीसाठी मेहनत घेताना दिसून येत आहे.
तपोवन परिसरातील तब्बल 16 एकर मैदानावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
या महोत्सवासाठी क्रीडामंत्री संजय बनसोडे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री दादा भुसे हे तीन मंत्री नाशिकमध्ये मुक्काम ठोकून आहेत.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला एक ते दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.