Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Fog : नाशिक जिल्ह्यावर पसरली धुक्याची चादर; पाहा खास Photos
पश्चिमी शीतलहरींमुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे नाशिककर आता थंडीची अनुभूती घेतांना दिसून येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडीमुळे नाशिक जिल्ह्यात पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई पसरल्याचे चित्र आहे.
पंचवटी येथील गोदाघाट परिसरातील नारोशंकर मंदिर परिसरात पहाटेच्या वेळी धुके दाटली होती.
थंडी पासून बचावासाठी शहरातील विविध ठिकाणच्या बाजारात स्वेटर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
बच्चे कंपनीपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत अनेक जण बाजारातून स्वेटर खरेदी करत आहेत.
थंडीपासून रक्षणासाठी लहान मुलांमध्ये आकर्षक टोप्या घेण्याचे क्रेझ यंदा दिसून येत आहे.
पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नाशिक येथील तिबेटीयन मार्केट परिसरात स्वेटर, शाल घेण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करत आहेत.
ग्रामीण भागातदेखील पहाटेच्या सुमारास धुकं पडत आहेत.
नाशिकची ओळख थंड हवेचे ठिकाण अशी आहे. मात्र दरवर्षीपेक्षा नाशिकमध्ये यंदा थंडी कमीच असल्याचे दिसून येत आहे.