Nashik Tourist Spots : नाशिकच्या पर्यटन स्थळांचे फोटो पाहा एका क्लिकवर
अंजनेरी किल्ला : अंजनेरी (Anjaneri Nashik) हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडले आहे. येथे डोंगरावर अंजनी मातेचे आणि हनुमानाचे मंदिर आहे. Photo Credit : Wikipedia
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रह्मगिरी (Brahmagiri Nashik) : हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. उंचीनुसार हा महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे. ब्रम्हगिरीच्या दक्षिणेला कळसूबाई, अलंग, कुलंग, मदन अशी सह्याद्रीतली काही शिखरे आहेत. हा डोंगर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. Photo Credit : Wikipedia
काळाराम मंदिर (kalaram Temple Nashik) : काळाराम मंदिर हे नाशिकचे प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते. हे मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले होते. Photo Credit : Wikipedia
मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित केला जातो. Photo Credit : Wikipedia
पांडवलेणी (Pandhavleni Nashik) :नाशिकच्या पांडवलेणीदेखील अत्यंत प्रसिध्द आहेत. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आढळतात. याठिकाणी एकूण २४ लेणी आहेत. Photo Credit : Wikipedia
श्री सप्तश्रृंगी गड (Saptashrungi Gadh Nashik) : कळवण तालुक्यात सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘अर्ध शक्तीपीठ’ म्हणून हे मंदिर ओळखले जाते.चैत्र व अश्विन नवरात्रात याठिकाणी मोठी यात्रा भरते. Photo Credit : Wikipedia
सुला वाईनयार्ड्स (Sula Vineyards Nashik) : नाशिक हे द्राक्ष शेतीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. तसेच सुला वाईनयार्ड्सनेदेखील जगभरात आपला नाव लौकिक कमावला आहे. शेती, सुंदर हॉटेल आणि निसर्गरम्य परिसरामुळे येथे देशविदेशातून पर्यटक येतात. Photo Credit : Wikipedia
सुंदर नारायण मंदिर (Sundar Narayan Temple Nashik) : हे मंदिर गोदावरी तटावर आहे. या मंदिराची बांधणी १७५६ मध्ये गंगाधर चंद्रचूड यांनी केली होती. मंदिरात श्रीविष्णूच्या डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वतीच्या मूर्ती आहेत. Photo Credit : Wikipedia
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar Jyotirling Nashik) : भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान म्हणून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ओळखले जाते. Photo Credit : Wikipedia
१२ ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकच्या ज्योतिर्लिंगाला विशेष आहे. पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. Photo Credit : Wikipedia