Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवासानिमित्त चाहत्याकडून अनोखी मानवंदना!

Sachin Tendulkar Birthday :मुंबईतील चारकोप परिसरात राहणा-या नितीन इंदुलकरनं 18 हजारहून अधिक पुश पिनांच्या सहाय्यानं सचिनचं मोझैक रेखाटलंय.

Sachin Tendulkar Birthday

1/12
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवासानिमित्त एका चाहत्याकडून अनोखी मानवंदना.
2/12
मुंबईतील चारकोप परिसरात राहणा-या नितीन इंदुलकरनं
3/12
18 हजारहून अधिक पुश पिनांच्या सहाय्यानं सचिनचं 'मोझैक' रेखाटलंय.
4/12
चार दिवसांच्या अथक नेहनतीनंतर नितीननं आपलं हे शिल्प केलंय. विविधरंगी पुश पिनांचा वापर करून सचिनचं रेखाटलेलं हे शिल्प पाहताच क्षणी मोहून टाकतं
5/12
मुळातच कलात्मकतेची जाण आणि आवड असलेल्या नितीनं पेन्सिल कार्विंगवरही आपल्या या लाडक्या दैवताचं नाव अतिशय सुबकरित्या कोरलंय.
6/12
सचिनवर आज त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त जगभरातून चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना.
7/12
नितीनसारखे काही फैन्स आपल्या कलेतून क्रिकेटच्या या देवाला आपली मानवंदना वाहताना पाहायला मिळतायत.
8/12
Sachin Tendulkar सचिन तेंडुलकर आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.
9/12
आज सचिनने त्याच्या वयाची हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केले आहेत.
10/12
यामध्ये जगात सर्वाधिक 100 शतके करण्याच्या अनोख्या विक्रमाचाही समावेश आहे. तसेच सर्वाधिक एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
11/12
24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर सचिनने नोव्हेंबर 2013 निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतरही त्याने क्रिकेटशी नातं जोडलं आहे.
12/12
ते आजही अबाधित आहे. यावर्षी फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर 51 व्या क्रमांकावर होता.
Sponsored Links by Taboola