Nashik Rain Update : गोदामाई पुन्हा खळाळली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, पाहा PHOTOS
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरण 93.4 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगंगापूर धरणातून सकाळपासून टप्याटप्याने विसर्गात वाढ केली जात आहे.
गंगापूर धरणातून सकाळी 8 वाजता 520 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला. तर दुपारी एक वाजेपासून 2 हजार 382 क्यूसेक, दुपारी 4 वाजता 3 हजार 900 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसला आहे.
अनेक छोटी मंदिर पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी गेले आहे.
पाण्याची पातळी वाढत असली तरी जीव धोक्यात घालून लहान मुलांना घेऊन पर्यटक फोटो सेशनची हौस भागवत असल्याचे दिसून आले आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.