Nashik Rain Update : अखेर नाशकात पावसाचं 'टाईम प्लीज', गोदाघाटावरील परिस्थिती नेमकी काय? पाहा PHOTOS
नाशिक शहरासह जिल्ह्यात सलग तीन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली. गंगापूर धरणातून सोमवारी 9,450 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 6 हजार 20 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
होळकर पुलाखालून 10 हजार 502 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने चौथ्या दिवशीही गोदाकाठावर पूरस्थिती कायम आहे.
गोदाकाठावरील अनेक मंदिरे अजून देखील पाण्याखाली असल्याचे चित्र आहे.
काल रात्रीपासून तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे गोदावरीच्या पूरस्थितीत काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.
गंगापूर दारणासह 13 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नाशिकहून जायकवाडीला पाणी जात असल्याने नगर आणि मराठवाड्याच्या पाण्याची तहान भागणार आहे.
हवामान खात्याकडून पुढील तीन दिवस नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट अर्थात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारी शहरात दिवसभरात 15.3 मिमी पाऊस पडला. तर सोमवारी 13.0 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.