Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : नाशिकमध्ये पार पडले 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन
नाशिकमध्ये रविवारी चक्क रस्त्यावरील खड्डे या विषयावर पहिले काव्य संमेलन पार पडले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया संमेलनाला 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन' असे नाव देण्यात आले होते. कवींनी या संमेलनाच्या माध्यमातून सरकार आणि महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याचंही बघायला मिळालं.
खड्डे झाले स्मार्ट गड्यांनो सेल्फी काढू चला, महापालिकेची काढा पालखी.. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कायापालट नाशिकचा, यांच्या घरात भरली खोकी बाजार दिवाळखोरीचा, अशा कविता या संमेलनामधून सादर करण्यात आल्या.
नाशिकच्या सीबीएस परिसरातील आयटक कामगार केंद्रच्या हॉलमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हे 'स्मार्ट खड्डे काव्य संमेलन' आयोजित करण्यात आलं होतं.
या संमेलनात सामाजिक कार्यकर्तेही सहभागी झाले होते. खड्ड्यांवर कविता करून महापालिका प्रशासन आणि राजकारण्यांना या संमेलनातून चांगलेच धारेवर धरण्यात आले. खड्डयांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत या संमेलनाची सुरुवात झाली होती.
नाशिक शहरात जुलै महिन्यात पडलेल्या दोन पावसानेच मुख्य रस्ते आणि कॉलनी रस्ते अशा सर्वच रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय.
खड्यात साचलेल्या पाण्यामुळे खोलीचा अंदाज येत नसल्याने छोट्या मोठ्या अपघातातही वाढ झाली असून वाहनचालकांना वाहनं चालवतांना मोठी कसरत करावी लागतीय.
विशेष म्हणजे यावर नागरिकांनी अनेक वेळा आवाज उठवूनही हा त्रास कमी होण्याचं नाव घेत नसल्याने नाशिकमधील स्थानिक लेखक आणि कवींनी एकत्र येत पहिल्यांदाच या आगळ्या वेगळ्या काव्य संमेलनाचे आयोजन केले होते.