PHOTO: 3.8 किमी स्विमिंग, 180 किमी सायकलिंग, 42 किमी रनिंग, नाशिकच्या 19 'आयर्नमॅन' स्पर्धकांची कमाल
अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नाशिकच्या 19 स्पर्धकांनी आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App3.8 किमी स्विमिंग, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
कझाकिस्तानमध्ये ही स्पर्धा नुकतीच पार पडली होती.
नाशिकच्या तीन खेळाडूंनी आर्यनमॅन स्पर्धेवर कब्जा करण्याची हॅट्रिक केली आहे
तर स्पर्धेतील एका पितापुत्रांनी एकाच स्पर्धेत भाग घेत ती यशस्वी पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला आहे.
विशेष म्हणजे याच स्पर्धेत नाशिक शहर पोलीस मुख्यालयात अंमलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या अश्विनी देवरे यांचाही सहभाग होता.
अश्विनी यांचे पती हे सैन्य दलात कार्यरत असून त्यांना दोन मुलेही आहेत.
मुलांचा सांभाळ करत आणि पोलीस दलातील अतिशय व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढून अश्विनी यांनी स्पर्धेची तयारी केली.
या यशानं नाशिक पोलिस दलाचे नाव सातासमुद्रापार गेलं आहे.
या कामगिरीनंतर सर्व स्तरातून कौतुकाचा पाऊस पडत आहे.