Nashik : नाशिकचा सावरकर वाडा विविधरंगी फुलांनी सजला, दिवाळीनिमित्त फुलांची आकर्षक सजावट, पहा फोटो

नाशिक जिल्ह्यातील भगूर हे सावरकरांचं जन्म गाव, हे भगूर गाव आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथील स्मारकात दिवाळी निमित्ताने झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
यंदा दिवाळीच्या निमित्ताने आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
झेंडूच्या फुलांच्या सजावटीमुळे स्मारक आकर्षक दिसू लागलं आहे. ही सजावट भगूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती जपलेल्या सावरकर वाडा आजही पर्यटकांनी गजबजलेला दिसून येतो.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झेंडू, गुलाब, शेवंती, गुलछडी अशा देशी- विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
संपूर्ण स्वातंत्र्यवीर वाड्यासह स्मारक आवार, प्रवेशद्वार आणि सभामंडपात ही फुलांची सजावट करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या आनंदाच्या क्षणी स्मारकात फुलांची आरास केली आहे.
लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी भगूर येथे राज्यात देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ निर्माण करण्यात येणार आहे.