Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Rain : गोदामाई पाहुणी आली! नाशिक जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटिंग, डोळे दिपवणार गोदावरीचे विहंगम दृश्य
नाशिकची जीवनवाहिनी म्हणून गोदावरी नदीची ओळख आहे, यंदा अनेक दिवसांनंतर गोदावरी मनभरून वाहू लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने नाशिकसह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने आभाळमाया केली आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
गोदावरीच्या पुराचे मापक म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला देखील पावसाने अंघोळ घातली आहे.
त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत असून धरणातील पाणी नदीत प्रवाहीत झाल्याने गोदामाई खळाळली आहे.
अनेक दिवसांपासून पाऊसच नसल्याने यंदा गोदामाई खळाळली नव्हती, तसेच दुतोंड्या मारुतीला पुराचे पाणीच लागलेले नव्हते.
पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु असल्याने गंगापूर धरणातील पाणी नदीत प्रवाहीत झाल्याने गोदामाई खळाळली आहे.
तर अनेक दिवसांनंतर दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत.
गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने गोदावरी नदीत विसर्ग सुरु आहे, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वीस टक्क्यांची वाढ झाली आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.