Shravni Somvar : त्र्यंबकेश्वरला गर्दीचा महापूर, तिसऱ्या श्रावण सोमवारी एक लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी, पहा ड्रोन फोटो
तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांनी गजबजून गेल्याच पाहायला मिळालं. एक लाखाहून अधिक भाविकांची त्र्यंबक नगरीत हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जवळच्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ लागलेली असते. तर श्रावण महिन्यात देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. त्र्यंबकेश्वर दर्शनासह लाखो भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीची प्रदक्षिणा देखील पूर्ण केली.
तिसऱ्या श्रावण सोमवारानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास लाख ते दीड लाख भाविकांची गर्दी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारला भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर ला श्रावण महिन्यात विशेष महत्व असते.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांचा ओघ जास्त असतो. रविवारी सायंकाळ पासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता.
संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपारपर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रविवार सायंकाळपासून ते सोमवारी दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जातच होते.
जवळपास एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती.
प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग दर्शनासह भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीचा आनंदही घेतला. तर ब्रम्हगिरी फेरी मार्गावर बमबम भोलेच्या जयघोषाने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.