Nashik Ganpati 2023 : कुठे चांद्रयान, कुठे केदारनाथ, तर कुठे सोन्याची जेजुरी, नाशिककरांच्या घराघरातले गणपती डेकोरेशन पाहिलेत का?
नाशिककरांच्या घराघरात आज गणपती विराजमान झाले असून अनेकांच्या हटके डेकोरेशन लक्ष वेधले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडेच भारताने यशस्वी चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी केली, त्यावर आधारित देखावे करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडोबाचे ठिकाण असलेल्या सोन्याची जेजूरीचा देखावा करण्यात आला आहे.
चंद्रयान 3 मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अवकाशातील अंतराळ देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आले.
काही नाशिककरांनी अगदी साध्या फूल, हाराच्या माध्यमातून आकर्षक देखावे केले आहेत.
मालेगाव येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या निवास स्थानी श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली.
नाशिकमधील एका गणेशभक्ताने आपल्या हाताने गणेश मूर्ती साकारत गणेशाची स्थापना केली आहे.
उत्तराखंड येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या धर्तीवर केदारनाथ मंदिराचा सुंदर देखावा साकारण्यात आला आहे.
नाशिक जिल्हा परिषदे कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गणेशाची स्थापना करण्यात आली.
अशा पद्धतीने नाशिककरांनी वेगवेगळ्या स्वरूपात देखावे साकारत गणपतीची स्थापना केली आहे.