Nashik News : 'आधी उन्हाचा रखरखाट आणि आता रिमझिम पाऊस...आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, महिलांशी संवाद
आदित्य ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजी नगरमध्ये दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आज नाशिक जिल्हा दुष्काळ पाहणी दौरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दौरा करत असताना स्थानिक महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तसेच आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांमध्ये बसत संवाद साधत सरकारवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे दौऱ्यावर असताना रस्त्यात अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले, यात अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता.
निफाड तालुक्यातील भेंडाळी गावात मंदिरात बसून स्थानिक गावकऱ्यांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, यावर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत सरकारला धारेवर धरले.
आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी दौऱ्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिकांची पाहणी केली.
शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी शेतीचे कसे नुकसान होत आहे, याबाबत शेतकऱ्यांची चर्चा केली.
शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं असून संकटकाळात बळीराजाला मजबूत पाठबळ हवंय आणि आम्ही ते देणार!
आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सरकारकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांचा निरोप घेतला.