Nashik Fire: 20 तासांपासून धुमसणारी इगतपुरीतील आग अखेर नियंत्रणात; अजुनही परिसरात धुराचे लोळ
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगीची दाहकता एवढी होती की, परिसरातील गावातूनच या आगीचे लोळ दिसत होते.
सध्या इगतपुरीतील जिंदाल कंपनीला लागलेली आग नियंत्रणात आली आहे.
आग नियंत्रणात आली असली तरी अद्याप आग विझलेली नाही.
तब्बल 20 तासांपासून आग धुमसतच होती, अद्यापही 15 ते 20 टक्के आग धुमसतीच आहे.
जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीत होरपळून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 17 जण जखमी झालेत.
आगीत दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिमा आणि अंजली अशी दोघा मृत महिला कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट झाले असून केमिकल लिकेज होऊन आग लागल्याची संशय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बॉयलरचा भीषण स्फोट होऊन ही आग लागल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं होतं. त्यानंतर भीषण स्फोट होऊन आग लागली.