Nashik New Year : नाशिकच्या गंगापूर बॅक वॉटरसह बोट क्लब पर्यटकांनी फुलला, मनात भरणार डेस्टिनेशन
थर्टी फस्ट साजरी करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले असून गंगापूर धरणाती जवळील बोटक्लबवर पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवघे काही तास नवे वर्ष साजरे करण्यासाठी शिल्लक असून नाशिककरांनी बोट क्लबला पसंती दिली आहे.
गंगापूर बॅकवॉटर सह सावरगाव, गंगावर्हे परिसरात रिसॉर्ट व हॉटेल्स फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच बोट क्लब परिसरात देखील पर्यटकांनी गर्दी केली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गंगापूर धरणाजवळील बोट क्लब येथून नयनरम्य नजारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह नाशिककरांनी गर्दी केली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत गंगापूर धरण परिसरात बोट क्लब चालविला जातो आहे. या प्रशस्त जागेत नौकानयनाचा आनंद लुटता येणार आहे.
बोट क्लबवर क्रुझर जेटसह, बनाना राईड, क्रुझर शिप अशा विविध माध्यमातून नौकानयनाचा आनंद लुटला जातो आहे.
दहा मिनिटांच्या लहान सफरपासून चाळीस मिनिटांपर्यंतच टूरदेखील घडविली जाते आहे. परिसरातच कॅन्टीन कार्यान्वित असून, येथील भव्य सभामंडपात बसून शांततेची अनुभूती अनेक पर्यटक घेत आहेत.
सरते वर्ष आणि नवे वर्ष अशा दोन्ही दिवशी विकेंड आल्याने बोट क्लब परिसरात पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. थर्टी फस्टच्या सेलीब्रेशनसाठी तरुणाईची उपस्थितीदेखील लक्षवेधी ठरत आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गंगापूर धरणाजवळील बोट क्लब येथून नयनरम्य नजारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पर्यटकांसह नाशिककरांनी गर्दी केली आहे.
अवघे काही तास नवे वर्ष साजरे करण्यासाठी शिल्लक असून नाशिककरांनी बोट क्लबला पसंती दिली आहे. (सर्व फोटो : किरण कटारे, एबीपी माझा)