PHOTO : नाशिकमध्ये बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा डाव उधळला
नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याच्या कातडीसह इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा डाव वनपथकाने हाणून पाडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या पंधरा दिवसांत ही तिसरी कारवाई असल्याने नाशिक वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचे केंद्र बनत चालल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर जवळील अंबोली फाट्यानजीक मोठ्या शिताफीने बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले होते.
त्यानंतर बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या स्लीपर सेल्सना न्यायालयात हजर केले असता त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.
एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर पाच दिवसांपूर्वी दिंडोरी परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या स्लीपर सेल्सना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयिताशी संपर्क साधला.
आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सापळा नाशिक शहरातील इंदिरा नगर परिसरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅक जवळ ही कारवाई करण्यात आली.
संशयित आरोपींमध्ये तिन्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे. संशयितांच्या सोबत आणखी काही साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर कारवाईत एक बिबट वन प्राण्याची कातडी, चिकाराची दोन शिंगे, निलगाईचे दोन शिंगे तसेच चार मोबाईल असा मुद्देमाल संशयितांकडून ताब्यात घेतला आहे.
पुढील चौकशीसाठी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.