Nashik Ganeshotsav : अलोट गर्दी, तुफान उत्साह, नाशिक गणेश विसर्जन मिरवणूक पहा एका क्लिकवर
अखेर दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर नाशिकमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरु असून थोड्याच वेळात विसर्जनाला सुरवात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीचा शुभारंभ गणरायाची आरती करून केला आहे. नाशिक शहरातील नेहमीच्या वाकडी बारवी येथून निघणाऱ्या मिरवणुकीला आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली.
यावेळी सुरुवातीला नाशिक महानगरपालिकेच्या गणपती बाप्पाला मिरवणुकीच्या अग्रभागी असून त्यानंतर नाशिक शहरातील मानाचा पहिला गणपती रविवार कारंजा मंडळाच्या चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला आहे.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर बाप्पाचे दिमाखात आगमन झाले. त्यानंतर दहा दिवसांच्या आनंदायक वातावरणात बाप्पाचा सोहळा पार पडला.
मागील दहा दिवसांपासून घरोघरी, सार्वजनिक मंडळात गणेशाचे नाशिकरांनी दर्शन घेतले. मात्र आज बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे.
नाशिकच्या वाकडी बारव परिसरातून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला असून मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मिरवणुकीला शुभारंभ झाला आहे.
सुरवातीला महानगरपालिकेच्या बाप्पाची आरती करून मिरवणुकीला सुरवात झाली. शहरात पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात महापालिकेचे गणपतीची मिरवणूक सुरू करण्यात आली.
दरम्यान मुख्य मिरवणुकीला सुरुवातीला सुरवात झाली असून नाशिक महानगरपालिकेच्या गणपती बाप्पारथ मिरवणुकीच्या अग्रभागी आहे. तसेच त्यानंतर नाशिक शहरातील मानाचा पहिला गणपती रविवार कारंजा मंडळाचा चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला आहे.
दरम्यान मुख्य मिरवणुकीला सुरुवातीला सुरवात झाली असून नाशिक महानगरपालिकेच्या गणपती बाप्पारथ मिरवणुकीच्या अग्रभागी आहे.
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून शहरातील प्रमुख 15 गणेश विसर्जन ठिकाणी वैद्यकीय पथकांचा सुसज्ज रुग्णवाहिका ठेवण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला उधान आले आहे.
नाशिकमध्ये (Nashik) सकाळी 11 वाजेपासून सुरू असलेली गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणूक अद्यापही सुरूच असून या मिरवणुकीवर पावसाचं सावट होतं. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली,
ढोल ताशांच्या निराळात वातावरण अगदी चैतन्यमय झाले असून लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी अख्ख नाशिक एकवटल आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागातही गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहाचे वातावरण आहे.
या ठिकाणी सुद्धा सहस्रानंद वाद्य वाजविण्यात येत असून अनेक ढोलपथकांचा समावेश यात करण्यात आला आहे. नामदार गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल वादन करीत आनद लुटला. शिवाय त्यांनी तालही धरला. तसेच त्यांनी गणेश विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी केले.
चांदोरी येथील गार्गीने देखील लाडक्या बाप्पाच्या कानात गुपित सांगत भावपूर्ण वातवरणात निरोप दिला.
नाशिकमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला उधान आले आहे. ढोल ताशांच्या निनादात वातावरण अगदी चैतन्यमय झाले आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अजान सुरू होताच ही मिरवणूक थांबवण्यात आली जुन्या नाशिक भागातून मिरवणूक जात असताना अजान सुरू झाल्यानंतर ढोल पथकाने वादन थांबवलं