नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाली सुरू असून विकासाच्या बाता आणि गप्पा प्रत्येक नेत्याच्या तोंडातून ऐकायला मिळत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मात्र, विकास व विकास हेच लक्ष्य असल्याचे सांगणाऱ्या नेत्यांना काही गावांतील नागरिकांना, विद्यार्थ्यांना होणारा त्रास कधी दिसणार असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

शाळेला जातो आम्ही, पण जीवघेणा प्रवास करून असंच विद्यार्थी म्हणत आहेत, कारण चक्क जेसीबीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी नदी ओलांडून घर गाठलं आहे.
नाशिकच्या चांदवड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. चांदवड शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने चार दिवसांत गोई नदीला तिसऱ्यांदा पूर आला.
तिसगाव -हिवरखेडे रस्त्यावरील गोई नदीवर असलेल्या फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शाळेत जाण्यासाठी किंवा शाळेतून घरी येण्यासाठी विद्यार्थ्यांना आज जेसीबीच्या सहाय्याने नदीच्या पुलावरील प्रवाह ओलांडण्यास मदत करण्यात आली.