Nashik : नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS
मंदिराची नगरी असणाऱ्या नाशिकमध्ये रामाची मूर्ती सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या तपोवनात प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असणाऱ्या नाशिकच्या पंचवटी, तपोवन परिसरात वनवास काळात श्रीरामाचे वास्तव्य होते असे मानले जात असल्याने.. राम जन्मभूमी असणाऱ्या आयोद्धेनंतर नाशिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नाशिकच्या तपोवन परिसरात 70 फूट उंचीची ही रामची मूर्ती उभारण्यात आली आहे.
हाच धागा पकडून नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या पुढाकारातून 70 फूट उंचीची ब्राँझ धातूची धनुर्धारी रामाची मूर्ती उभारण्यात आली आहे.
प्रभू श्रीरामाची मूर्ती ही महाराष्ट्रतील सर्वात उंच मूर्ती असल्याचा दावा करण्यात येतोय.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील एक दोन दिवसांत लागू होणार असल्याने आजच या मूर्तीचे लोकार्पण केले जाणार असून महाराष्ट्रातील सर्वात मोठी रामाची मूर्ती असल्याचा दावा केला जातोय.
धार्मिक तीर्थक्षेत्र असणाऱ्या नाशिक नगरीत श्रीरामाची ही भव्य मूर्ती पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.