Nashik Nandgaon Fog : नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos

Nashik Nandgaon Fog : नांदगाव परिसरावर दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे कांदा व इतर शेतीपिकांवर रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Continues below advertisement

Nashik Nandgaon Fog

Continues below advertisement
1/7
गेल्या दोन दिवसापासून नाशिकच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरण असून आज सकाळी नांदगाव शहर व परिसरात दाट धुक्याची चादर पसरली.
2/7
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हे दृश्य आहे.
3/7
या धुक्यामुळे कांदा व इतर शेती पिकांवरही रोगांचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
4/7
आज पडलेले धुके एवढे दाट होते की काही फुट अंतरापर्यंत काहीच दिसत नसल्याने वाहने दिवे लावून चालवावी लागत होते.
5/7
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी मात्र या वातावरणाचा सुखद अनुभव घेतला.
Continues below advertisement
6/7
3 जानेवारीपासून 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
7/7
नाशिकमध्ये आजचे तापमान 16.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
Sponsored Links by Taboola