Nashik Army Aviation : है तय्यार हम...डोळ्यांची पारणे फेडणारा दीक्षांत समारंभ सोहळा
शिस्तबद्ध पडणारी पाऊल, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण…अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये ३७ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होतं, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या दीक्षांत सोहळ्याचे.
यावेळी ३७ जणांच्या वैमानिकाच्या या तुकडीचे मुख्य आकर्षण होत्या कॅप्टन अभिलाषा बराक. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशनच्या दीक्षित सोहळ्यास आज त्यांची विशेष उपस्थिती होती.
दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने केलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते ३७ वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
यावेळी त्या सोहळ्याच्या प्रमुख म्हणून कॅप्टन अभिलाषा बराक उपस्थित होत्या. आजच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांना वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून एव्हीएशन विंग प्रदान करण्यात आली.