PHOTO : आदिवासींच्या व्यथा, समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे नाशिकमधील पाड्यावर!

Aaditya Thackeray

1/9
राज्यातील सीनिअर राजकारणी आरोप प्रत्यारोप, सवाल जवाब, उत्तर सभा, संकल्प सभा, बूस्टर सभा, मास्टर सभा यात दंग असतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन पुन्हा एकदा महाराष्ट्राला झाले.
2/9
भोंगे, हनुमान चालीसा, धर्म, जात यावरुन राजकारण तापत असताना आदित्य ठाकरे आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी थेट आदिवासी दुर्गम पाड्यावर जाऊन पोहोचले.
3/9
पहिल्यांदाच मंत्री आपल्या गावात आल्याने मेटघर किल्ला गावातील बाया-बापड्या भडाभडा बोलू लागल्या. मतदानापुरते सारेच उमेदवार येतात मात्र एकदा निवडणूक झाली कोणी फिरकत नाही, असा अनुभव आमदार-खासदारच्या उपस्थितीच आदित्य ठाकरे यांच्यासमोर कथन केला.
4/9
अधिकारी येत नाही, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, विहिरी तळ गाठत आहेत, त्यामुळे जगण्यासाठी पाणी आणावं तरी कुठून अशी कैफियत मांडताना महिलाच्या घशाला अक्षरशः कोरड पडत होती. आदित्यही त्यांच्यात बसून सारं ऐकत होते. स्वतः मंत्री मांडी घालून बसले म्हटल्यावर जिल्हाधिकाऱ्यांसह इतरांपुढे जमिनीवर बसण्यापलीकडे पर्याय नव्हता.
5/9
आदित्य यांनी सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर गावात कायमस्वरुपी पाण्यासाठी साठवण तळे आणि रस्त्यांची कामं सुरु करण्याचे आश्वासन देत अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या, त्याचा शुभारंभ करण्यात आला.
6/9
आदित्य ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी हात जोडून त्यांचे आभार मानले. इतक्या वर्षानंतर कोणीतरी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आल्याने समस्यांपासून सुटका होईल असा विश्वास स्थानिकांना वाटत आहे.
7/9
मेटघर किल्ल्यानंतर आदित्य यांचा ताफा गंगाद्वारकडे वळला. शाल टोपी देऊन आदित्य ठाकरे यांचं स्वागत झालं. इथेही ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधत कामं तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिलं.
8/9
याच गंगाद्वारपासून सुमारे साडेसातशे पायऱ्या उतरुन आदित्य ठाकरे त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले. वाटेत कुठे पूरातन मंदिर, पाण्याचे स्रोत दिसले तर आदित्य तिथे थांबत होते, दौऱ्याचा शेवट त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाने झाला. देवासमोर नतमस्तक होताना कोरोनाप्रमाणेच पाण्याचे संकटही टळू दे अशी प्रार्थना करत आदित्य पुढील प्रवासाला निघाले.
9/9
थेंबभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांच्या डोळ्यातील अश्रूंची धार आदित्य यांच्या येण्याने सध्यातरी पुसली गेली आहे. सामाजिक तेढ निर्माण करुन स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या इतर राजकारण्यांपेक्षा आदित्य वेगळे आहेत हे देखील या दौऱ्याने अधोरेखित झाले.
Sponsored Links by Taboola