Nashik Chandwad Rain : चांदवडला पावसाची वादळी सलामी, कांदा शेड, झाडे, विद्युत खांब कोसळले, अनेक जण जखमी
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात काल मेघगर्जनेसह वादळी पावसाने सलामी लाखोंचे नुकसान केले आहे. परिणामी अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कांद्याचे शेडही उडाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान काल नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. सायंकाळी मात्र वरुणराजाने हलक्या सरींनी आगमन केले. मात्र चांदवड तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मात्र एकीकडे बळीराज सुखावला असला तरी वादळी पावसाने चांगलेच नुकसान केले आहे.
तर या पावसात कांदा व्यापाऱ्यांचे शेड, झाडे, विद्युत खांब कोसळल्याने अनेक वाहनांसह विविध वास्तू-वस्तूंचे नुकसान झाले. दरम्यान कुठे झाड कोसळून तर कुठे पत्रा लागून अनेक जण गँभीर तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे चक्रीवादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिला. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. तसेच चांदवड येथे कांद्याचे शेड अंगावर पडून माजी आमदार शिरीष कोतवाल हे जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहर परिसरात वीज पुरवठा खंडित असून पडलेल्या विद्युत खांबांची संख्या जास्त असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास देखील मोठा विलंब होणार आहे.
पावसामुळे शहरातून जाणाऱ्या मुंबई-इंदौर महामार्गावर गाडी चालविणे मुश्किल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चालकांनी जागच्या जागी वाहने थांबवून घेतल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
चांदवड तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मात्र एकीकडे बळीराज सुखावला असला तरी वादळी पावसाने चांगलेच नुकसान केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी मान्सूनचे आगमन होणार आहे.