PHOTO : इगतपुरीच्या खैरेवाडीत पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या आदिवासी पड्यावरील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण काही केल्या थांबत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविहिरीत उतरुन पाणी भरण्याच्या यादीत आणखी एका गावाची नोंद झाली आहे.
इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे.
तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर विहिरीत खाली 30 ते 35 फूट खाली उतरुनही गाळ मिश्रित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
एक जण विहिरीत उतरतो आणि दोर लावून सोडलेल्या प्लस्टिकच्या कॅनमध्ये पाणी भरुन देतो, सकाळ संध्याकाळ पाण्यासाठीचा हा जीवघेणा संघर्ष सुरु आहे.
लेकरा बाळांसह हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची पायपीट सुरु आहे.
नाशिक जिल्ह्याला हे दृश्य नवीन नाही, मात्र वर्षोनुवर्षे असेच पाणी भरत असूनही सुधारणा होत नसल्याने सरकारी अनास्था, उदासिनतेविषयी संताप व्यक्त होत आहे.
जलस्त्रोत आटत चाललं असल्याने घशाची तहान कशी भागवावी, हा प्रश्न पडला असून गुरढोरही पिणार नाहीत असं पाणी ग्रामस्थांनी प्यावं लागत आहे.