Nashik Saptshrungi Gad : नाशिकच्या सप्तशृंगी गडावर एनडीआरएफची टीम दाखल, मंदिर मार्गाची स्वच्छता
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर काल सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरीलावली. यावेळी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर पुराचा लोंढा आल्याने भाविक जखमी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता सप्तशृंगी देवी मंदिराच्या स्वच्छतेसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी स्वच्छता करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पावसामुळे मंदिर मार्गावर मोठ्या प्रमाणात गाळ, दगड, कचरा इतर साहित्य येऊन पडल्याने मार्ग देखील खचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची टीम या ठिकाणी स्वच्छतेचे काम करते आहे.
सप्तशृंगी गडावर संपूर्ण परिसराची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे, नव्याने बांधकाम करण्यासाठी देवस्थान ट्रस्टला वेळ आवश्यक असल्याने मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील 45 दिवस म्हणजे दीड महिना सप्तशृंगी देवीचे दर्शन घेता येणार नाही.
सप्तशृंगी देवी मंदिर हे 21 जुलैपासून ते ०५ सप्टेंबर पर्यंत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे सप्तश्रुंगी देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
सप्तश्रुंगीगड मंदिराच्या वरील बाजूने अतिवृष्टी होऊन सर्व पुराचे पाणी पायऱ्यांनी खाली उतरले. यावेळी उतरली पायरी असल्याने चढ मार्गावर पूर परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पुराबरोबर मोठ्या संख्येने दगड गोटे, माती, झाडांचे रोपटे देखील वाहून आल्यानें मंदिरात जात असलेल्या भाविकांची धावपळ उडाली.
पुढील दीड महिना सप्तशृंगी मंदिर बस असणार आहे, मात्र भाविकांना दर्शन घेता येणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या शेवटच्या पायरीवर देवीची एक छोटी मूर्ती ठेवली जाणार आहे.
घटनेत सात भाविकांना किरकोळ इजा झाली होती. त्यांना उपचारासाठी धर्मार्थ आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय घटनास्थळी सप्तश्रुंगी देवी ट्रस्ट चे अधिकारी उपस्थित असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमने विशेष परिश्रम घेऊन भाविकांना सुरक्षित स्थळी हलविले.