Nashik Rain : नाशिक शहरासह जिल्ह्यात धुवांधार, अनेक पूल पाण्याखाली, रस्ते खचले, गावांचा संपर्क तुटला!
सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवनकडे जाणारा कोडीपाडा-ठाणगाव घाटात रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद झाला. या रस्त्यावर रहदारी राक्षसभुवन, करंजुल, भवडा, काहनडोळचोंड, आमदा बाऱ्हे, खिराटमाळ, मांडवे, करवळपाडा, गुजरात मधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुरगाणा तालुक्यातील पार नदीवर असणाऱ्या उंबुरणे-बेजावड पुलावरून पाणी गेल्याने पेठ तालुक्यातील झरी, अंबास, सावरणा कुंभाळे तर या बाजूने खिर्डी उंबरने, भाटी, भेनशेत आदी गावांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद गावच्या किकवी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने ब्राम्हणवाडे माळेगांव या गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच पुलावरून पाणी गेल्याने नदीच्या पलीकडे राहणाऱ्या पिंपळद गावातील ग्रामस्थांचा देखील गावाशी संपर्क तुटला असून गावची स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे.
तर सुरगाणा तालुक्यातील ननाशी बाऱ्हेच्या हस्ते घाटात दरड कोसळली असून माती खचून पूर्णपणे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे हा मार्ग देखील बंद झाला आहे. नानाशी येथून नाशिक जाताना बाऱ्हे, ठाणगाव अंभोरे, गडगा आदी भागातील संपर्क तुटला आहे.
तसेच अतिवृष्टीमुळे त्र्यंबक तालुक्यातील हरसूल जवळील शिरसगाव मुरंबी बांधकाम स्थितीत असणारा पूल वाहून गेला आहे. यामुळे गावातील लोकांना पर्यायी व्यवस्था म्हणून गडदवणे मार्गे गावठा येथून करण्यात आलेली आहे.
सुरगाणा-बाऱ्हे कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने दांडीची बारी, म्हसमाळ, शिरीषपाडा आदी गावाचा संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील गुरटेंभी येथील ताराबाई बन्सु भिवसन यांचे घर कोसळले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुरगाणा-बाऱ्हे कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने दांडीची बारी, म्हसमाळ, शिरीषपाडा आदी गावाचा संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील गुरटेंभी येथील ताराबाई बन्सु भिवसन यांचे घर कोसळले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.