PhotoGallery : परीक्षा, मेहनत अन् आता सेवेत...! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा दीक्षांत समारंभ, पहा नेत्रदीपक फोटो
परीक्षा, मेहनत अन् आता सेवेत...! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा नेत्रदीपक दीक्षांत समारंभ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र पोलीस अकादमी येथे दीक्षांत संचलन समारंभात 171 अधिकारी पोलीस दलात दाखल झाले. सिन्नर येथील राजू सांगळे यास उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला.
पोलीस महासंचालक रजनीश शेठ तसेच अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या उपस्थितीत पार पडला. परीक्षा मेहनत अन आता सेवेत दाखल झाल्याने प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पोलीस दलाकडून जनतेच्या आणि सरकार यांच्या अपेक्षा वाढत आहेत. नवी आव्हाने समोर येत आहेत. तेव्हा या सगळ्यासाठी तयार रहा असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी केले आहे.
यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केले. जवळपास १६० पुरूष ११ महिला असे एकूण १७१ नव्याने रुजू होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश यामध्ये आहे. प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सहभागी होत असलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सिन्नर येथील राजू सांगळे यास उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला. तर सोलापूरची उर्मिला खोत बेस्ट ऑलराउंडर कॅडेंट म्हणून पुरस्कार मिळाला. तर सुजित पाटील दुसरा बेस्ट स्टडीज कॅडेंट म्हणून निवड झाली.
या काळात भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, भारतीय पुरावा कायदा स्थानिक आणि विशेष कायदे यांची माहिती घेतली. फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र, बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव असे प्रशिक्षण पूर्ण केले आहेत.
सदर १७१ प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण ०२ ऑगस्ट 2021 पासून प्रशिक्षण सुरू झाले होते. 10 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी पूर्ण केले. या प्रशिक्षणार्थींपैकीं ६८ टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व पदव्युत्तर आहेत.
यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केले. जवळपास १६० पुरूष ११ महिला असे एकूण १७१ नव्याने रुजू होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश यामध्ये आहे. प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सहभागी होत असलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सिन्नर येथील राजू सांगळे यास उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला. तर सोलापूरची उर्मिला खोत बेस्ट ऑलराउंडर कॅडेंट म्हणून पुरस्कार मिळाला. तर सुजित पाटील दुसरा बेस्ट स्टडीज कॅडेंट म्हणून निवड झाली. (सर्व फोटो, मयूर बारगजे, एबीपी माझा, नाशिक)