Nashik Grampanchayat Election : नाशिकमध्ये ग्रामपंचायत निवडणुक निकालांत युवा उमेदवारांची चलती, कोणाची सरशी, पहा फोटो
नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यातील निवडणूक निकाल घोषित होत असून आतापर्यत चारही आतालुक्यातील काही ग्रापंचायतींचा निकाल हाती आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी असून त्या पाठोपाठ लालबावटा सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. मात्र अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून फक्त इगतपुरी तालुक्यातील निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ६९ पैकी २३ ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले असून बारा जागांवर राष्ट्रवादी तर एका जागेवर शिवसेना तसेच दहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यानुसार करंजुल ग्रामपंचातीवर माकप विजय मिळवला आहे. प्रभाबाई राठोड यांची सरपंच पदी निवड झाली आहे. तसेच पोहाडी, अंबाठा, ग्रामपंचायतीवर माकपने विजय मिळवला आहे.
पेठ तालुक्यात चार निकाल हाती आले असून राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. पेठ तालुक्यातील माळेगाव, शिवशेत, पाहुचीबारी आणि आंबे ग्रामपंचायतीवर सरपंच पदी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
तसेच पोहाडी, अंबाठा, ग्रामपंचायतीवर माकपने विजय मिळवला आहे. पोहाडी सरपंचपदी सुनिता दळवी, अंबाठा सरपंचपदी चौरे हरी महारू, तर डोल्हारे सरपंचपदी राष्ट्रवादीचे राजेंद्र गावित विजयी झाले आहेत.
सुरगाणा तालुक्यातील खोकरी ग्रामपंचायतीवर गाव विकास आघाडी सत्ता मिळवली आहे. गवळी कशिराम येऊ सरपंचपदी विराजमान झाले आहेत. तर कोठुळा ग्रामपंचायत सरपंचपदी अपक्ष उमेदवार काजंल गुबांडे हे निवडून आले आहेत.
शिवसेना, भाजप आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. मात्र अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून फक्त इगतपुरी तालुक्यातील निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.