Nashik Bus Fire : नाशिक बस अपघातांनंतर मिरची हॉटेल चौफुलीवरील परिस्थिती काय? पहा फोटोंच्या माध्यमातून...
नाशिक येथील औरंगाबाद रोडवरील बस अपघातानंतर आता सर्वच यंत्रणांना जाग आली असून पोलीस महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आरटीओ अशा सर्व यंत्रणा कार्यरत झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान अपघातानंतर चौफुलीवरील अतिक्रमण काढण्यास सुरवात केली असून येथील मिरची हॉटेलसह चहाचे दुकान काढण्यात येणार आहे. त्यानंतर अपघाताला आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना स्वच्छता करण्याबरोबर टाकळी बाजूने येणारे रिंग रोडचे डावीकडील वळण अधिक रुंद करण्यास सुरुवात झाली आहे. नगर नियोजन विभागाने अनधिकृत व अतिक्रमित बांधकामाचे डीमार्केशन केले व संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत.
तसेच या अपघाताचा शास्त्रीय दृष्ट्या शोध घेतला जात आहे. नेमके कोण? कसे व कोठे चुकले? आपत्कालीन यंत्रणांची मदत कधी व कशी पोचली यावल खल सुरू आहे. यासाठी दिल्ली येथून आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय पथकाने घटनास्थळी भेट दिली.
ओवर हेड वीज वाहिन्या भूमिगत केल्यानंतर रस्ता रुंदी करण्याचे काम मार्गी लावण्यात येणार आहे. मिरची चौफुलीवर गतिरोधक व दुभाजक बसवण्यात येणार आहे. त्या कामाला लवकर सुरुवात केली जाणार आहे.
ओव्हर हेड वीज वाहिन्या भूमिगत केल्यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लावण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत काम सुरु असल्याने सिग्नल यंत्रणा बंद असून वाहनांची गर्दीची परीस्थिती जैसे थे आहे. शिवाय वाहतूक पोलिसांचा अद्यापही सिग्नलवर पत्ता नसल्याने प्रशासन आणखी अपघाताची वाट पाहतंय का? असा सवाल उपस्थित होतो आहे.
दरम्यान महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंतांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून नांदूर नाक्याकडून येणाऱ्या महामार्गाच्या बाजूला सिग्नजवळ मोठ्या क्षमतेचे विद्युत रोहित्र देखील आहे. या रोहितरामुळे अपघाताची शक्यता वर्तवली गेल्याने ते देखील दुसरीकडे स्थलांतरित करण्याबाबत सांगण्यात आले.
टाकळी कडून येणाऱ्या जेजुरकर मार्गाची चौफुली जवळ डांबरीकरण करण्यात येत आहे. कैलास नगरच्या चौकातील रस्ता लागत असलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे.