Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Waghera Fort : नाशिकचा वाघेरा किल्ला आजही दुर्लक्षित, शिवकार्यच जबरदस्त दुर्ग संवर्धन
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 163 वी दुर्गसंवर्धन श्रमदान मोहीम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किल्ले वाघेरा या दुर्गांवर झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रमदानातून दुर्गसंवर्धकांनी किल्ल्याच्या पूर्वेस असलेल्या बुजलेल्या भग्न वाड्याचे अस्ताव्यस्त पडलेले दगड रचून, पुरातन वाड्याला झुडपातून मुक्त केले. तसेच पूर्ण बुजलेल्या टाक्यातून अभ्यासपूर्णपणे साडेचार फूट गाळ काढला
राज्यातील सर्वाधिक दुर्गांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील 65 हुन अधिक दुर्गांच्या संवर्धनासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या 21 वर्षे अविरतपणे राबत आहे.
दुर्गअभ्यास, दुर्गजागृती, अखंडित दुर्गसंवर्धन कार्याचा प्रवास आसलेल्या नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची वाघेरा किल्ल्यावर झालेल्या मोहिमेत प्रारंभी दुर्गआभ्यास करण्यात आला.
वाघेरा किल्ल्यावरील वनस्पती, फुले, पक्षी, वन्यजीव, ऐतिहासिक पुरातन जलाशये, वाडे, सैनिकांचे जोते, भग्न समाध्या, जुन्या गुहा, टाके, जोते, महादेव पिंड, शिवकालीन दोन हनूमान मुर्त्या, जुन्या गावाचे जोते, कश्यप ऋषी तपोभूमी व कश्यपी नदीचे उगमस्थान, तट, बुरुजांचे अवशेष, विविध वनस्पती, फुले यांची यादी तयार केली.
त्यानंतर किल्ल्याच्या पूर्वेस बुजलेल्या भग्न वाड्याचे अस्ताव्यस्त दगड चौरस आकारात भिंतीवर रचत वाडा झुडुपमुक्त केला. चारही बाजूने मातीचा भराव टाकून त्याच्या भग्न भिंती वाचवल्या.
दुपारच्या भोजन प्रहरानंतर थेट बुजलेल्या टाक्यातून साडेचार फूट गाळ काढला. स्वखर्चाने अविरतपणे चाललेल्या श्रमातून हे कामकाज केले.
तसेच वाघेरा, वेळुंजे येथील युवकांची साखळी करून दुर्गभ्यासक राम खुर्दळ यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमून वाघेरा किल्ला, धरण परिसर, सतीमाता पर्यावरण, पर्यटन, वाघेरा घाट स्वच्छता व निसर्ग संवर्धनासाठी नियोजन केले.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक,पर्यटन विभागाच्या दुर्गसंवर्धन समितीत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचा समावेश का नाही? याबद्दल संस्थेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला.
याकामी रवी माळेकर, जयराम बदादे, बाळू बोडके यांची त्रिसदस्यीय टीम घोषित करण्यात आली. वाघेरा दुर्गसंवर्धन मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या दुर्गसंवर्धकांसह बाल दुर्गसंवर्धक ईश्वर माळेकर मोहिमेत सहभागी झाले होते.