Nashik Civil Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालय इमारतीस ऑक्सिजनची गरज, रुग्णालय परिसर कचऱ्यात
सलग तीन वेळा दर्जेदार रुग्णसेवेच्या बळावर कायाकल्प पुरस्कार मिळवणारे नाशिकचे सिव्हिल हॉस्पिटल मात्र स्वतः व्हेंटिलेटर असल्याचे चित्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजही नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक चक्कर मारली तर परिसर कचराकुंडी असल्याचे दिसून येईल.
एकीकडे चांगल्या रुग्णसेवेसाठी पन्नास लाखांचे बक्षीस मिळवणारे सिव्हिल हॉस्पिटल मात्र स्वच्छतेच्या बाबतीत सपशेल नापास झाले आहे.
नाशिक जिल्ह्यासह इतर अनेक भागातून डॉक्टरांच्या विश्वासावर रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयात येत असतात. मात्र इथल्या भोंगळ आणि अनागोंदी कारभारामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत आहे.
आपल्या घराच्या आजूबाजूला जर स्वच्छता असली तर आपले कुटुंब निरोगी असते. त्यामुळे घरातील व्यक्ती नेहमीच परिसर स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य देत असतात.
रोज हजारो रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मात्र इथला परिसरच आजारी असल्याचे चित्र नेहमीचेच आहे.
त्यामुळे रुग्णाला बरे वाटण्यापेक्षा रुग्ण अधिकच खालावतो अशीच काहीशी परिस्थिती सध्या सिव्हिल हॉस्पिटलची झाल्याचे दिसून येते.
नेक ठिकाणी कचरा, बायोमेडिकल वेस्ट, उघड्या गटारीचे चेंबर, जाळलेला कचरा अशी स्थिती सध्या हॉस्पिटल आवारात आहे.
स्वच्छतेच्या बाबतीत नाशिक सिव्हिल हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण थेट सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला जातो. मात्र अशा स्थितीत रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे वास्तव आहे.