Photos : नाशिकमध्ये खासगी बसला आग, 11 जणांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरु
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.
ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली.
ही आग एवढी भीषण होती की 11 जणांचा मृत्यू झाला.
पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला.
सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.
अपघातातील जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.