Nashik : नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह, 'जय भवानी जय शिवाजी'चा गजर
संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. नाशिकच्या शिवप्रेमींतर्फे यंदा शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातून निघणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीला वाकडी बारव येथून सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यंदा मिरवणुकीत छत्रपती सेना हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान इंदिरानगर जाणता राजा मित्र मंडळ, शिवशाही फ्रेंड सर्कल आणि युवा संघर्ष प्रतिष्ठान हे चार मंडळ सहभागी झाले आहेत.
विशेष म्हणजे यातील छत्रपती सेनेच्या चित्र होतात 21 फूट कवड्यांचे माळ नागरिकांना पाहायला मिळणार आहे. या मिरवणुकीत ढोल पथकांबरोबरच पारंपारिक नृत्य सुद्धा नागरिकांना पाहायला मिळणार आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त नाशिक शहरातून निघणाऱ्या मिरवणुकीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून सुरुवात करण्यात आले आहे.
या मिरवणूक शहरातील चार चित्र सहभागी झाले आहेत. या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला असून मिरवणूक मार्गातील रस्ते सकाळपासून बंद करण्यात आले आहेत
नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात छत्रपती शिवराय जयंती निमित्त 61 फूट शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला असून तर दुसरीकडे छत्रपती सेनेच्या माध्यमातून 21 फूट कवड्यांची माळ साकारण्यात आली आहे. नाशिक शहरात मिरवणूक मार्गावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या असून शहर भगवामय झाले आहे.
नाशिक शहरातील महिलावर्ग बालिका लहान मुलं उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले असून अनेक जण महाराष्ट्रीयन पेहरावात पाहायला मिळत आहे. तर अनेक जण जिजाऊ शिवबाच्या वेशभूषेतही पाहायला मिळत आहे.
मिरवणुकीत ढोल पथकांबरोबरच पारंपारिक नृत्य सुद्धा नागरिकांना पाहायला मिळणार आहे.
नाशिक शहरातील महिलावर्ग बालिका लहान मुलं उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले असून अनेक जण महाराष्ट्रीयन पेहरावात पाहायला मिळत आहे. तर अनेक जण जिजाऊ शिवबाच्या वेशभूषेतही पाहायला मिळत आहे.