Nashik Shivjayanti : नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, नाशिकच्या गार्गीचा शिवजयंतीनिमित्त मराठमोळा रुबाब
शिवजयंतीनिमित्त नाशिकच्या गार्गीने शिवरायांना अनोखे अभिवादन केले असून हे सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या शिवजंयतीच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांत साठविणारे सुंदर फोटोशूट केले असून ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात शिवजंयतीचा उत्साह आहे. अवघ्या एका दिवसावर शिवजयंती येऊन ठेपली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात जयंतीची तयारी सुरु आहे.
शिवजन्मोत्सवासामुळे उत्साहाचं वातावरण असून नाशिक शहर भगव्या झेंड्यानी सजले आहे. तसेच यंदा मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असून अनोखे देखावेही पाहायला मिळत आहेत.
अशातच दर सण उत्सवाला चार चांद लावणाऱ्या गार्गीने शिवजयंती निमित्त मराठमोळं वेश परिधान केला आहे. त्याचबरोबर गडकिल्ल्याच्या सानिध्यात जाऊन मराठमोळ्या अंदाजातील फोटो, व्हिडीओ चित्रित केले आहेत.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील गार्गी आहेर या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या चिमुकलीचे हे फोटो, व्हिडीओ असून नेहमीप्रमाणे ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
गार्गीने शिवजयंती मराठमोळा पेहराव केला असून हातात भगवा ध्वज घेत ऊर्जा देणारे फोटोशूट केले आहे. नाशिक जवळील एका किल्ल्यावर हे फोटोशूट केलं आहे.
गार्गीला लहापणापासूनच डान्स, वक्तृत्व, अभिनय करायला आवडते. तसेच वडील सागर आहेर यांच्यासह आहेर कुटुंबीयांनी गार्गीची आवड बघून तिला संधी उपलब्ध करून दिली. मग दरवेळी अनेक कार्यक्रमांना ती आवड जोपासत असते.
काही दिवसांपूर्वीच तीने 26 जानेवारी निमित्त भन्नाट फोटोशूट केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी साजरा होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटो, व्हिडीओ शूट केले आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने केलेले हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून अनेक जणांनी गार्गीचे कौतुकही केले आहे.