Photo : 'भिडे आसमंती, ध्वजा वैष्णवांची! सिन्नरच्या अंगणात वारकऱ्यांचा डोळे दिपवणारा रिंगण सोहळा, पहा Photos
भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा… भक्तिने भारलेला रिंगण सोहळा, पाहावा याचि देही याचि डोळा… अशा भक्तीपूर्ण वातावरणात सिन्नर येथील दातली शिवारात अभूतपूर्व रिंगण सोहळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूरच्या विठू माऊलीची आस लागलेल्या वारकर्यांनी वारा-पावसाची तमा न बाळगता दातली येथील शेत शिवारात जागेत वैष्णवांचा रिंगण सोहळा झाला.
त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचा पाचवा दिवस दरवर्षीप्रमाणे सिन्नर तालुक्यातील दातलीच्या वैष्णव भूमीत रंगला.
दरम्यान रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी गर्दी केली. रिंगण सोहळ्यासाठी हजारो वारकर्यांच्या उपस्थित दातली ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
यावेळी रिंगण सोहळ्यातील वायुवेगाने धावणारे अश्वमेध, टाळ-मृदुंगाच्या भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी, माऊलीचा जयघोष हे सर्व डोळ्यात साठवून ठेवणारे चित्र विलोभनीय होते.
माऊलीच्या जयघोषात तुळशीवृंदावन डोक्यावर घेत वारकरी माउलींनी रिंगण भोवती फेरा लगावला. सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली. यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
या रिंगण सोहळ्यात देव रिंगण, टाळकरी रिंगण, विणेकरी रिंगण झाले. हा रिंगण सोहळा डोळ्यात साठवून ठेवत माऊलीचे जमिनीवर हात लावत दर्शन घेतले.
सर्व वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी, मृदुगवादक गोलाकार उभे राहतात. माऊली माऊली म्हणत हरिनामाचा गजर सुरू होतो. टाळ मृदुगाच्या एकाच तालात आणि एकाच लयित वारकरी नाचू लागतात. यानंतर दिंडीतील अश्व गोलाकार फिरत पालखीला प्रदक्षिणा मारतात. अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडतो.