Nashik News :'तुझा पाहुणी सोहळा, माझा रंगला अभंग!' नाशिकच्या बॉईज टाऊन शाळेत 'विठ्ठल नामाची शाळा भरली'
Nashik News : 'शाळा भरली, मात्र विठूनामाचा गजर करत, नामसंकीर्तनाचा सोहळा रंगला', पांढऱ्या सदऱ्यातील शाळकरी मुले, महाराष्ट्रीयन पेहरावात साड्या नेसलेल्या विद्यार्थिनी, अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉइज टाऊन शाळेत शाळकरी वारकऱ्यांचा रिंगण पार पडलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाळकरी मूळसंज्ञक शिक्षकांनी विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभुषेत रिंगण सोहळ्याला हजेरी लावली.
शाळांमध्येही विठ्ठलमय वातावरण असून दरवर्षी प्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉईज टाऊन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जणू खरंच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
एरव्ही शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस घेतलेले बाल वारकरी बॉईज टाऊनमध्ये अवतरले.
यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लिन झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थी शिक्षकांनी एकत्र येत ‘जय जय राम कृष्ण हरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असे अनेक अभंग गेले.
टाळ आणि वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण बॉईज टाऊन शाळेच्या क्रीडागंणावर निर्माण केले.
रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत या सोहळ्याचा शेवट झाला.