Nashik Shivpuran Katha : 5 लाखांहून अधिक भाविक, 25 क्विंटलची दालबट्टी, गर्दीचा व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!

मालेगाव येथील कॉलेज मैदानावर सुरू असलेल्या शिव महापुराण कथा महोत्सवात 5 लाखावर महिला, पुरूष भाविकांनी हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मालेगाव येथील कॉलेज मैदान-कॅम्परोडसह शहरातील सर्व रस्ते चार तासापेक्षा अधिक वेळ भाविक व वाहनांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले होते.

अभुतपुर्व भाविकांचा जनसागर रस्त्यावर उसळला असला तरी शिस्त व संयमाचे अनोखे दर्शन यावेळी घडून आले.
नाशिकच्या मालेगाव शहरात मागील सात दिवसांपासून महा शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते.
कुठेही गोंधळ-अथवा चेंगराचेंगरी न होता शहरासह बाहेर गावातील भाविक मार्गस्थ झाल्याने कथा समितीसह पोलीस-प्रशासन यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.
शिव महापुराण कथेची सांगता सोहळ्यात भाविकांची गर्दी झाल्याने पार्किंगसाठी उभारलेले 15 वाहनतळ वाहनांच्या गर्दीने तुडूंब भरले होते.
कॅम्परोड, कॉलेजरोड, साठफुटी रोड, सटाणारोड, संगमेश्वर, जुना आग्रारोड आदी प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
दरम्यान पहिल्या दिवसांपासून सुरु असलेल्या भोजन दानांत सुमारे तीन लाख भाविकांना आस्वाद घेतला. यासाठी राजु मामा मंडावेवाला यांनी नियोजन केले होते.
सकाळ संध्याकाळ ३५ हजाराहून अधिक भोजनाचा आस्वाद घेतला. तर सांगता सोहळ्यात 25 क्विंटलची दालबट्टीसह 20 क्विंटलची मिठाई भाविकांसाठी बनविण्यात आली.
शिवमहापुराण कथेचा सांगता सोहळ्याप्रसंगी लाखोंच्या संख्येने हजेरी लावल्याने गर्दीचा उच्चांक दिसून आला. ड्रोन फोटो : शेखर सयाजी गायकवाड (मालेगांव)