Nashik Onion Issue : ध्यानात ठेवा कांदा! लक्षात ठेवा कांदा! राष्ट्रवादीचं चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन
या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय', केंद्र सरकार हाय हाय, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी चांदवड परिसर दणाणून गेला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप सरकारने मुहूर्ताची वाट न पाहता तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान अडीच हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
कांदा दरावरुन चांगलेच रान पेटले असून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये (Chandwad) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कांदा दरावरुन नाशिकसह (Nashik) राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे नाफेडच्या माध्यमातून खरेदी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
विधानभवनात कांदा प्रश्नावरुन (Onions Issue) विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मात्र अद्यापही कांद्याबाबतची परिस्थिती जैसे थे आहे.
अशातच विरोधी पक्षांकडून वारंवार आंदोलने केली जात आहे. आज राष्ट्रवादीकडून महामार्गावर कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अक्षरश कांदा रस्त्यावर फेकून देण्यात येऊन राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करुन कांद्याला किमान 2500 रुपये हमीभाव जाहीर करावा. कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याच्या निषेधार्थ आंदोलन झाले.
तसंच घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदा प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
कांद्याचे दर, द्राक्षाचे पडलेले दर, वाढती महागाई या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरु केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि पंकज भुजबळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
एकीकडे सरकार म्हणतंय हे शेतकऱ्यांचे सरकार, मात्र दुसरीकडे गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कांद्याला भाव नाही, अवकाळीमुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. (सर्व फोटो : किरण कटारे, एबीपी माझा, प्रतिनिधी)