Rain : अवकाळी पावसाचा 'दगा', द्राक्ष बागांचं मोठं नुकसान
हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विभागात पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिकमध्ये (Nashik) सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
काल दीड वाजता द्राक्ष बागेचा व्यवहार केला होता आणि अडीच वाजता पावसानं द्राक्षाचं नुकसान झाल्याची माहिती गोरख जायभावे या शेतकऱ्याने दिली.
पावसामुळं द्राक्ष (Grapes) बागांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच नाशिक तालुक्यातील बेळगांव ढगा परिसरात गारपीट झाल्यानं निर्यातक्षम द्राक्षाला मोठा फटका बसलाय.
बुधुवारी रात्री नाशिक जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.
द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं निर्यातक्षम द्राक्षाच्या मण्यांना तडे गेले आहेत.
शेतकऱ्यांनी या बागा जगवण्यासाठी मोठा खर्च केला आहे. खर्च करुन अवकाळी पावसानं मोठं बागेचं नुकसान केलं आहे.
नाशिकमध्ये (Nashik) सलग चौथ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं द्राक्ष (Grapes) बागांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
निर्यातक्षम द्राक्षाच्या मण्यांना तडे गेले आहेत. शेतकऱ्यांनी या बागा जगवण्यासाठी मोठा खर्च केला आहे.