Nashik Long March : 2018 च्या पायी लॉन्ग मार्चची पुनरावृत्ती, नाशिक-मुंबई लॉन्ग मार्चला सुरवात, फोटो पाहा एका क्लिकवर
Nashik Long March : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत (Mumbai) लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लॉन्ग मार्च काढला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिंडोरी मधून हा लॉन्ग मार्च (Long March) निघाला असून विविध मागण्यांसाठी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन (Farmers Protest) करत आहे.
शिवाय आदिवासींच्या वनजमिनींच्या प्रश्नासंदर्भात माकप आक्रमक झाले असून नाशिक-मुंबई असा लॉन्ग मार्च (Nashik Mumbai Long March) काढण्यात आला आहे.
नाशिकच्या (Nashik) दिंडोरी येथून या लॉंगमार्चला सुरवात झाली असून काहीवेळातच हा लॉन्ग मार्च नाशिक शहरात दाखल होणार आहे. दरम्यान लॉंगमार्च मध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व रस्त्यामध्ये भेटत असून सहभागी होत आहेत.
यावेळी माजी आमदार जेपी गावित (JP Gavit) म्हणाले कि, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हैराण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला, कांद्याचे भाव गेले, द्राक्ष बाग देखील खराब झाल्या आहेत.
कापूस आणि सोयाबीनचे पण भाव देखील कोलमडले आहेत. शेतकरी वर्ग वैतागलेला असून सरकार याबाबत दखल घेत नाही. सरकारी कार्यालयात आता कंत्राटी भरती केली जात आहे.
त्यामुळे सरकारची भूमिका हळूहळू बदलायला लागलेली आहे. म्हणून आमचा मोर्चा काढला असून महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्यासाठी हा मोर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी मोर्चा असल्याचे गावित म्हणाले.
वन जमिनीचा प्रश्न आहे. शेतकरी कसत असलेली वन जमीन आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करावी हा मुख्य मुद्दा आहे.
त्याचबरोबर सातबारा कोरा करावा अशी मोर्चाची मागणी आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा विषय आहे.
आदिवासींना वन जमिनी मिळाव्यात या मुख्य मागणीसाठी हा लॉन्ग मार्च काढण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान सरकार काय दखल घेत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.