Nitin Gadkari : आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाची नितिन गडकरींकडून हवाई पाहणी
महाराष्ट्रातील आळंदी आणि पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि अधिकारी यांच्यासह पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा 234 किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) - सासवड - जेजुरी - निरा - लोणंद - फलटण - नातेपुते - माळशिरस - बोंडले - वाखरी - पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे.
या मार्गावर एकूण 12 पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.
सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी या बाबींवर आधारित काम करण्यात येईल.
यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात 57,200 आणि दोन्ही बाजूस मिळून 18,840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे
नितीन गडकरी यांनी मार्गाची पाहणी करुन सर्व बाबी जाणून घेतल्या आणि काही सल्ले दिले.