Nashik News : येरे पावसा! दोन महिन्यांपासून नाशिकला पाऊस नाही, पावसासाठी शाळेनं थेट लगानची मॅचचं भरवली! फोटो पहाच..
मागील दोन महिन्यांपासून नाशिकसह जिल्ह्यावर पाऊस रुसला की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिककरांसह शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या सी.बी.एस.ई विभागामार्फत पावसाला साकडं घालण्यासाठी थेट क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन केल्याचं पाहायला मिळालं.
असा तसा क्रिकेटचा सामना नाहीतर काही वर्षांपूर्वी आलेल्या लगान चित्रपटाच्या धर्तीवर क्रिकेटचा सामना भरवत पावसाला साकडे घातले आहे.
यंदा जून महिन्याच्या अखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली. रान शिवार फुलवलं, शेती मातीला बहर आला. याच पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा हंगाम सुरु केला.
मशागत, नागराणीसह लागवडी झाल्या. दुसरीकडे नागरिकही पावसामुळे ओलेचिंब झाले. पर्यटनसहली वाढल्या. मात्र त्यांनतर जी पावसाने दडी मारली ती मारलीच.
गेल्या दोन महिन्यापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात रिमझिम पाऊस होतो आहे, मात्र दमदार पाऊस नसल्याने बहुतांश धरणे तहानलेलीच असून शेतकरी सुद्धा आता संकटात सापडला आहे.
त्यामुळे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी अनेकदा वेगवगेळे उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनोख्या पद्धतीने वरुणराजाला साकडे घातले आहे.
आज नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात असलेल्या भोसला स्कुलमध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. कारण काय तर पावसाला साकडे घालण्यासाठी.
या मॅचचे वेगळेपण म्हणजे लगान चित्रपटाप्रमाणे पोशाख घालत सामना खेळविण्यात आला.
नाशिकसह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावावी, सर्वाना ओलेचिंब करावं, शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करावं, म्हणून या अनोख्या लगान सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.