Nashik News : बागलाणचं केळझर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं; दिंडोरीच्या पुणेगाव धरणातून विसर्ग, पाहा नयनरम्य फोटो
Nashik News : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात अद्यापह पावसाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील काही भागात रिपरिप सुरु असल्याने धरणे हळूहळू भरू लागली आहेत.

Punegaon dam
1/9
नाशिक शहरासह जिल्ह्यात अद्यापह पावसाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील काही भागात रिपरिप सुरु असल्याने धरणे हळूहळू भरू लागली आहेत.
2/9
दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा पेठ, आदी तालुक्यांसह कसमादे पट्ट्यात रिपरिप सुरु असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
3/9
बागलाण तालुक्यातील केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ओसंडून वाहू लागले आहे. तर दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.
4/9
बागलाणच्या पश्चिम भागास वरदान ठरलेले ५७२ दलघफू क्षमता असलेले केळझर (गोपाळ सागर) धरण आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरले.
5/9
धरणाच्या सांडव्यावरून आरम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. केळझर मध्यम लघू प्रकल्प परिसरात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे केळझर धरण ओसंडून वाहू लागले आहे.
6/9
बागलाण तालुक्यातील बहुतांशी शेती सिंचनाखाली आणण्यात केळझर धरणाच्या डांगसौंदाणे पाणलोट क्षेत्राचा मोठा फायदा होतो. केळझर धरणं भरल्याने आरम खोऱ्यातील शेतकरी आनंदी झाले आहे. शेत व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
7/9
दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसत असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
8/9
धरणाच्या दोन दरवाजातून ओझरखेड धरणाकडे पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
9/9
दिंडोरी तालुक्यात एकूण सहा धरण असून , त्यापैकी फक्त पुणेगाव धरण प्रथम पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
Published at : 07 Aug 2023 03:05 PM (IST)